Search
Close this search box.

जय खेडकर व मिहीर चिंदरकर यांना ब्राँझ मेडल….!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग-विवेक परब

  • ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत चिंदर पालकरवाडी शाळेचे यश

जानेवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत जिल्हा परिषद शाळा चिंदर पालकरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी 100% यश संपादन केले आहे. या परीक्षेला 6 विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 100% लागला आहे.
यामध्ये इयत्ता 2 री मधील की. जय अमोल खेडकर यास 89 टक्के गुण तसेच इयत्ता 3 री मधील मिहीर चिंदरकर याने 85 टक्के गुण मिळवत ब्राँझ मेडल प्राप्त केले आहे. तसेच ईशिता शिशिर पालकर, मिधिलेश समीर लब्दे, यशश्री अमोल खेडकर, लिखित दिशांत पडवळ या सर्व विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत यश संपादन केले.
विद्यार्थ्यांना शिक्षक अमोल भगवान खेडकर व केंद्रप्रमुख मा.श्री. प्रसाद चिंदरकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल चिंदर सरपंच नम्रता महंकाळ-पालकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिशिर पालकर, उपाध्यक्ष सौ. मनवा मिलिंद चिंदरकर, ग्रा. सदस्य सौ. दुर्वा पडवळ, माजी सभापती हिमाली अमरे, पालक, ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें