उत्कृष्ट शिक्षक-प्रशिक्षक पुरस्कार डॉ.बी.एम.पाटील यांना प्रदान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : येथील संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.पाटील यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक प्रशिक्षक परिषदेचा अनंत जोशी उत्कृष्ट शिक्षक प्रशिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. आझाद शिक्षणशास्त्र महाविद्यालय सातारा येथे ‘नवे शैक्षणिक धोरण’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात डॉ.पाटील यांचे शैक्षणिक,अध्यापन, सामाजिक बांधिलकी,लेखन, महाविद्यालय विकास व विद्यार्थी विकास कार्य अशा सर्वच क्षेत्रांचा विचार करून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. शिक्षणतज्ञ डॉ.ह.ना. जगताप व महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक-प्रशिक्षक परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कारास उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले, या पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याचा मला आनंद वाटतो. बी.एड. प्रशिक्षणात आमुलाग्र बदल घडवणारे शिक्षणतज्ञ अनंत जोशी यांच्या नावे मिळालेल्या ह्या पुरस्कारामुळे माझ्या कार्यात सातत्य ठेवण्याची जबाबदारी निश्चितच वाढलेली आहे. मला मिळालेल्या पुरस्कारामध्ये संस्था कार्याध्यक्ष मा.अभयकुमार साळुंखे, पदाधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थिनी, माझा मित्र समूह व माझ्या कार्याला पाठिंबा देणारे माझे कुटुंबिय या सर्वांचाच मोठा वाटा आहे.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिवा शुभांगीताई गावडे ,मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, संस्थेचे पदाधिकारी व गुरुदेव कार्यकर्ते यांनी प्राचार्य डॉ.बी.एम.पाटील यांना या पुरस्काराबद्दल शुभेच्छा दिल्या तर महाविद्यालयातील प्रा.डॉ.एम. एस.उभाळे,प्रा.डॉ.लक्ष्मी भंडारे, प्रा.डॉ.अर्चना चिखलीकर, प्रा.डॉ.देवदत्त खजूरकर, ग्रंथपाल प्रा.ए.जी.पाटील,प्रा.ए.आर. पंडित, प्रा.पी.एस.शेंडगे, संजय कुंभार, सुजाता हजारे व हनुमंत वाघमारे यांनी प्राचार्य डॉ.बी.एम.पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें