प्रतिनिधी – अतुल काळे
- भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ व ‘विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम
सांगली/तासगाव : इस्रो (ISRO) Indian Space Research organisation (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) म्हणजे “भारतीय अंतराळ संशोधन संस्था ” व “विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र ” यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सांगली शिक्षण संस्थेच्या चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर तासगाव च्या प्रांगणामध्ये “अंतरिक्ष महायात्रा” ही बस येणार आहे. तासगाव परिसरातील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना याचा निश्चितच फायदा होणार आहे. विविध मॉडेल्स/ वैज्ञानिक उपकरणे तसेच अंतरिक्ष ची माहिती सांगणारी ही बस आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी तसेच विज्ञानाची आवड वाढवण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. सर्व तासगावकर, विज्ञान प्रेमी, शिक्षक व विद्यार्थी यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर शाळेचे मुख्याध्यापक व सदर स्पेस ऑन व्हील्स संयुक्त उपक्रमाचे आयोजक मुकुंद जोग आणि पर्यवेक्षक श्री. ऐतवडेकर यांनी केले आहे।