प्रतिनिधी – अतुल काळे
- चंपाबेन मधे ग्राहक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे प्रबोधन
सांगली/तासगांव – येथील चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदीर शाळेमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी बोलताना मिलींद सुतार म्हणाले, शालेय जीवनापासून ग्राहक संरक्षण कायद्याविषयी जागरुक राहिल्यास भविष्यात होणारी फसवणूक टाळता येऊ शकते. विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासा व्यतिरिक्त विविध कायद्यांची मुलभूत माहिती घेणं आवश्यक आहे. मोबाईलचा वापर करुन नेटवर उपलब्ध असणाऱ्या विविध क्षेत्रातील जीवनोपयोगी गोष्टी समजून घ्याव्यात. तसेच कोणतीही वस्तू खरेदी करताना त्याची पक्की पावती घ्यायची सवय आत्तापासून लावून घ्यावी.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक प्र.ना ऐतवडेकर यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. नितीन जोशी यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.