आरवडे येथील प्रचार सभेत रोहित पाटील सुरेश पाटील यांच्यावर टीका

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जर दीड दिवसाच्या उपोषणाने पाणी आलं तर 47 वर्ष काय केलं? : स्वप्निल पाटलांचा घणाघाती सवाल

प्रतिनिधी – अतुल काळे

आरवडे येथील प्रचार सभेत रोहित पाटील, सुरेश पाटील यांच्यावर टीका

सांगली/तासगाव : केंद्रात व राज्यस्तरा वर काकांनी पाठपुरावा करून मंजुरी आणल्याचे कळल्यानंतर निवेदन टाईप करायचे, उपोषणाचे नाटक करायचं व आम्ही पाणी आणले म्हणून टीमक्या वाजवायच्या. जर खरोखरच निवेदन देऊन आणि दीड दिवस उपोषण करून पाणी येत असेल तर आमदारकीच्या 35 व जिल्हा परिषदेच्या बारा वर्षाच्या काळात पाणी का आले नाही ?

असा संतप्त सवाल विचारतानाच अजून अर्धा दिवस उपोषण करा व राहिलेल्या भागाला लगेच पाणी आणा असा टोला रोहित पाटील यांचे नाव न घेता स्वप्नील पाटील यांनी लगावला
महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तासगाव कवठेमंकाळ मतदार संघाचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आरवडे येथे आयोजित प्रचार सभेत स्वप्निल पाटील यांनी रोहित पाटील व सुरेश पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली.
यावेळी सुखदेव पाटील सुनील पाटील आर डी पाटील, प्रमोद शेंडगे, संदेश भंडारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी पुढे बोलताना स्वप्नील पाटील म्हणाले, दिवाळी देण्याच्या नावाखाली गोरगरिबांच्या घरात दोन लाडू, चार करंज्या व बारा शंकरपाळ्या देऊन त्याबरोबर पैशाची पाकीट देताना रोहित पाटलांची माणसे सापडली. आमदारकीचा प्रकार व आठ एकर बागेतून एवढे तीन- तीन हजार रुपये वाटायला कुठून येतात. नक्की ते पैसे कुठून म्हणतात असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला
स्वप्निल पाटील म्हणाले, प्रत्येक वेळेला नवीन खोटं बोलायचं धंदा यांनी काढला आहे. रोहित पाटील विमानाने दिल्लीला काश्मीरला जाणार. त्यांचे चुलते, चुलत भाऊ या सगळ्यांचे बरं चाललंय मात्र मतदारसंघाला दहा वर्षाचा सुतक यांनी कायम ठेवले आहे. त्यामुळे लोकांनी आता खोट्या सहानभूतीला बळी पडू नये. तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघात आपल्याला आता परिवर्तन घडवायचा आहे आणि संजयकाकांना विजयी करायचंय असे आवाहन यावेळी स्वप्नील पाटील यांनी केले.

Leave a Comment

और पढ़ें