प्रतिनिधी – अतुल काळे
सांगली/तासगाव : सध्याचे युग डिजिटल चे युग आहे. नवीन तंत्रज्ञानाबरोबर पत्रकार बंधू – भगिनींना लोकांपर्यंत बातम्या पोहोचवणं अधिक सोपे बनणार असून विविध क्षेत्रातील मंडळींनी, पत्रकारांनी एकत्र येऊन लोकांना चांगलं देण्याचा प्रयत्न केला आहे. असे प्रतिपादन पत्रकार ज्ञानदा कदम यांनी तासगाव येथे केले. तासगाव येथून नव्याने सुरू झालेल्या यु – ट्यूब चॅनलच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
तासगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांनी एकत्र येऊन एका न्यूज चॅनलचे उद्घाटन करत डिजिटल मीडियामध्ये पदार्पण केले. पत्रकार ज्ञानदा कदम यांच्या हस्ते कॅमेऱ्याला पुष्पहार अर्पण करून चॅनेलची सुरुवात करण्यात आली. यावेळी चॅनेलचे समूह प्रमुख विष्णू जमदाडे, संकेत पाटील, प्रशांत सावंत, अशोक जमदाडे, संस्कृती माळी, संजय माळी, किरण देवकुळे आदी पत्रकार बंधू, नागरिक उपस्थित होते.