प्रतिनिधी – अतुल काळे
- राज्यात शेकापच्या नाराजी मधून तासगावात उमेदवारी?
सांगली /तासगाव : राज्यात आघाडी कडून मिळालेल्या वागणुकीतून महाराष्ट्रात 18 विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष निवडणूक लढवणार असून तासगाव कवठेमंकाळ मतदार संघात पक्षाच्या वतीने अर्जुन थोरात आणि दिगंबर कांबळे विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याच्या हालचाली सुरू आहेत.
शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची तासगावात नुकतीच बैठक पार पडली. यावेळी बाबुराव लगारे,बाबुराव जाधव ,पांडुरंग जाधव ,समीर कोळी ,दत्तात्रय थोरबोले ,सदाशिव सासणे, दिगंबर कांबळे, चंद्रशेखरपोळ, दत्तात्रय पोतदार, राजेंद्र पोतदार, सूर्यकांत पाटील, दिलीप पाटील, शुभम थोरबोले, पप्पू रेंदाळकर आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार, शेतकरी कामगार पक्षाची इतर वेळी भक्कम मदत घेतली जाते. जागा वाटपा वेळी मात्र शेकाप वर अन्याय होतो. मित्र पक्षांनी दिलेली दुय्यमतेची वागणूक चांगली नाही. यावर उपाय म्हणून राज्यात जवळपास 18 विधानसभा मतदार संघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवेल. पक्ष सन्मानाने विधानसभा निवडणूक लढवेल. असा निर्णय घेण्यात आला.
शेकापच्या याच नाराजी मधून तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघामध्ये अर्जुन थोरात, दिगंबर कांबळे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. पक्षाकडून मिळालेल्या आदेशावर दोघे संभाव्य उमेदवार काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्यांच्या या उमेदवारीबाबत काही मंडळींनी भेट घेऊन पाठिंबा दिल्याचेही बोलले जात आहे.