प्रतिनिधी- अतुल काळे
सांगली/तासगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सांगली विभागाच्या वतीने आयोजित ‘शिव मल्हार यात्रा’ मध्ये दाखल झाली. शिवराज्याभिषेकाची 350 वर्ष पूर्ती आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षा निमित्त यात्रेचे आयोजिन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी होळकर यांनी जगाला दिलेला समरसतेचा विचार सर्वसामान्यांपर्यंत रुजवण्यासाठी सातारा, कराड आणि सांगली जिल्ह्यात 1000 कि.मी. चा प्रवास यात्रा करणार आहे. दि. 7 ऑक्टोबर पासून यात्रेस सुरुवात झाली. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, मेढा, वाई, खंडाळा, फलटण, दहिवडी, खटाव, कोरेगाव, पाटण, कराड, 32 शिराळा, ईश्वरपूर, पलूस, कडेगाव, विटा, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ नंतर तासगाव येथे यात्रा पाचारण झाली. तासगाव येथील सिद्धेश्वर चौक येथे यात्रा रथ आल्यानंतर नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रियंका माने, राहुल साळुंखे, विघ्नेश घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा पुढे मार्गस्थ झाली.