त्या आरोपीला फाशी द्या : मविआची मागणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे 

  • महाविकास आघाडीची तासगावात निदर्शने 
  • गृहमंत्र्यांच्या राजीनामाची मागणी
  • ‘ बदलापूर घटनेतील पिडितेला न्याय मिळाला पाहिजे ‘ च्या घोषणा

सांगली/ तासगाव : बदलापूर येथील चिमुरडी वर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तासगाव शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेच्या अनुषंगाने मविआ कडून शनिवार दिनांक 24 रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार हा बंद मागे घेण्यात आला. तर या घटनेचा निषेध व्यक्त करताना शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून शिवतीर्थापर्यंत निषेधाच्या घोषणा देत राग व्यक्त करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख मा. प्रदीप माने पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तालुका अध्यक्ष मा. विश्वास पाटील यांनी बदलापूर मधील घडलेल्या घटनेवरून सरकारवर ताशेरे ओढत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, त्याचबरोबर यापुढच्या काळात महिलांवर अत्याचार होऊ नये यासाठी नागरिकांनी आणि प्रशासनाने दक्षता घेतली पाहिजे असे अशी भूमिका यावेळी घेण्यात आली.

यावेळी प्रदीप माने – पाटील, विश्वास पाटिल, विशाल चंदूरकर, गजानन खुजट, अमोलनाना शिंदे, विशाल शिंदे, अर्जुन थोरात, पुरण मलमे, तानाजी पाटिल, छायाताई पाटिल, विलास जमदाडे, स्वप्नील जाधव, अभिजित पाटिल, दिलीप कोळीगुडे, अजित जाधव, दत्ता आवळे, अमोल पाटिल उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें