Search
Close this search box.

तासगाव मध्ये अंनिसच्या चित्रप्रदर्शनाला उस्फूर्त प्रतिसाद

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  •  चार हजार विद्यार्थ्यांनी घेतला चित्रप्रदर्शनचा लाभ 

सांगली/ तासगाव : करणी आणि अंधश्रद्धा या विषयावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्र भरातुन भरभरून प्रतिसाद मिळाला. सांगली येथे शांतिनिकेतन येथे सुरुवात झालेल्या या उपक्रमाला जिल्हा भर विविध शाळा महाविद्यालये पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

दिनांक १४ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत तासगाव शहरातील लोकनेते डी एम बापू पाटील विद्यालय तासगाव,नं१२,नगर परिषद शाळा नं७, नगरपालिका शाळा नं९,संत नामदेव नुतन मराठी ज्ञानप्रबोधिनी, महाराष्ट्र रत्न वि.स.पागे विद्यानिकेतन विद्यालय स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर तासगाव येथे आयोजन करण्यात आले. करनी, भानामती यासाठी वापरली जाणारी काळी बाहूली जाळून मुलांच्या मनात असणारी करणी विषयची अनामिक भीती दूर करण्यात आली. अंनिस तर्फे आयोजित या चित्रप्रदर्शनाला विद्यार्थ्यातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास चार हजारहून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनींनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.

Leave a Comment

और पढ़ें