Search
Close this search box.

स्वातंत्र्यदिनी तासगावात आजी – माजी सैनिकांचा सत्कार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे 

  • जिवा शिवा सेना प्रतिष्ठानचा उपक्रम

सांगली/तासगाव : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तासगाव येथील जिवा शिवा सेना प्रतिष्ठानच्यावतीने तालुक्यातील नाभिक समाजातील ३८ आजी – माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून चितळे महाविद्यालय भिलवडीचे अधीक्षक संतोष गायकवाड होते. अध्यक्षस्थानी गलाई व्यावसायिक जनार्दन जाधव(शेठ) होते. परिचय ज्वेलर्स व कलेक्शनचे मालक सुरेश माने, हातनूरच्या सरपंच जयश्रीताई माने प्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी संत सेना महाराज व वीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी बोलताना संतोष गायकवाड म्हणाले , तासगाव तालुक्याचे देशसेवेत मोठे योगदान राहिले आहे. यामध्ये नाभिक समाजाचा वाटाही मोठा आहे. देशसेवेचे कार्य करणाऱ्या आजी – माजी सैनिकांचा समाजाला अभिमान आहे. त्यांचा सन्मान राखला पाहिजे.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते आजी – माजी सैनिकांचा शाल , श्रीफळ , सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. परिचय उद्योग समूहाच्यावतीने जिलेबीचे वाटप झाले. सेवानिवृत्त सुभेदार दीपक साळुंखे , प्रकाश माने, राजाराम सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वागत प्रतिष्ठानचे सचिव सुमित माने यांनी केले. प्रास्ताविक दत्तात्रय सपकाळ यांनी केले. सूत्रसंचालन विनोद गायकवाड यांनी केले. आभार उपाध्यक्ष उमेश गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमास प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळकृष्ण जाधव , माजी सरपंच नामदेव माने , संत सेना सेवा संघाचे अध्यक्ष रोहित गायकवाड , प्रभाकर गायकवाड , सोपान गायकवाड , रघुनाथ जाधव, धोंडीराम गायकवाड, धनाजी जाधव, सागर गायकवाड, विठ्ठल काळे आदी समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें