प्रतिनिधी -अतुल काळे
सांगली/तासगाव : सर्व पात्र महिलांना लाभ मिळावा याकरिता जाचक अटी शिथिल कराव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील, निमणीचे उपसरपंच आर. डी. पाटील, सिद्धेवाडीचे दादासाहेब कांबळे आदींनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती दोडमिसे यांची तासगाव येथे भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा केली।
या चर्चेदरम्यान, योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना उत्पन्नाचा दाखला, ज्या महिला अशिक्षित आहेत किंवा लग्न होऊन सासरी आलेल्या आहेत त्यांना अधिवास प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत। जन्माचे दाखले तसेच विवाह नोंदणीची प्रमाणपत्रे उपलब्ध होत नाहीत. लग्नापूर्वीचे नाव काही दाखल्यांवर आहे यासंदर्भात लग्नाचा पुरावा।
विवाह नोंदणी प्रमाणपत्र यांच्या ऐवजी स्थानिक ग्रामपंचायत अथवा तलाठी कार्यालय यांचे दाखले ग्राह्य धरावेत, आधार कार्ड , शिधापत्रिका स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र, स्व – साक्षांकित प्रतिज्ञापत्र याच्या आधारे आधिवास प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे . ज्या मुलींचा विवाहच झालेला नाही परंतु निराधार आहेत त्यांच्या बाबतीतही निर्णय होणे आवश्यक आहे. कुटुंबाची व्याख्याही स्पष्ट होणे आवश्यक आहे. अशा अनेक अडचणींवर सविस्तर चर्चा झाली.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चर्चेदरम्यान सांगितले की, यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. प्रत्यक्ष येणाऱ्या अडीअडचणी आम्ही शासनाला कळविलेल्या आहेत. या संदर्भात शासनाकडून काही गोष्टींचा खुलासा अपेक्षित आहे तसेच सुधारित मार्गदर्शक तत्वे ही लवकरच प्राप्त होतील. कोणतीही पात्र महिला शासनाच्या निर्णयानुसार वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे बाबत सर्व संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. माननीय जिल्हाधिकारी सांगली यांनीही महसूल विभागातील अधिकाऱ्यांना तात्काळ दाखले देण्याबाबत सूचना केलेल्या आहेत त्यानुसार कार्यवाही सुरू आहे।
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी डॉ संताजी पाटील, शंकर गावडे,पी.एल. कांबळे इत्यादी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.