प्रतिनिधी अतुल काळे
- महिला तंत्रनिकेतन तासगाव मध्ये एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
- स्वावलंबी भारत अभियानांतर्गत कार्यशाळेचे आयोजन
सांगली/तासगांव : स्वावलंबी भारत अभियान आणि येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने वीरांगना सभागृहात झालेल्या कार्यशाळेत बोलताना मिलींद सुतार म्हणाले, त्यामुळे स्वावलंबी भारत अभियानाने तरुणांमध्ये उद्योजकता वाढावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नोकऱ्यांचे आकर्षण आहे. मात्र दरवर्षी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या तरुणांची संख्या आणि उपलब्ध नोकऱ्यांची संख्या यांचे प्रमाण व्यस्त आहे. परिणामी चांगल्या क्षेत्रात अतिउच्च शिक्षण घेवून सुद्धा मोठ्या संख्येने तरुण बेकार राहतात. या बेकार तरुणांची मानसिकता निराशाजनक होत जाते, या निराशेपोटी आत्महत्या आणि गुन्हे गारीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तरुणांनी नोकऱ्यांच्या मागे न धावता उद्योजकच बनावे.
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या कार्यशाळेत बोलताना श्री सुतार पुढे म्हणाले, संयुक्त राष्ट्र महासंघाने ८ मार्च १९७५ रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे यावर्षी साजरा होणारा जागतिक महिला दिन हा सुवर्ण महोत्सवी असेल.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. संदीप पाटील म्हणाले, केवळ परीक्षेला बसण्यासाठी अभ्यास करण्या बरोबरच जगात चालू असलेल्या घडामोडींकडे सुद्धा आपले लक्ष असले पाहिजे. विद्यार्थिनींनी शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण नोकरी करणार कि व्यवसाय करणार याबद्दल ठाम निर्णय योग्य वेळेवर घेणे आवश्यक आहे. तसेच तरुणांमध्ये उद्योजकता वाढविणे हि काळाची गरज आहे असेही ते म्हणाले. प्रा. प्रिती कोले यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.