Search
Close this search box.

तासगाव तालुका बायो शुगर सहकारी कारखान्याच्या अपात्र ठरलेल्या चेअरमनना पदावरून हटवा – आर. डी. पाटील

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तासगाव यांच्या कडे तक्रार दाखल

सांगली/तासगाव : निमणी (ता. तासगाव) येथील तासगाव तालुका बायो शुगर सहकारी कारखान्याचे चेअरमन जगन्नाथ पांडुरंग मस्के हे श्री दत्त सहकारी पाणीपुरवठा योजना मर्यादित,निमणी या संस्थेचे थकबाकीदार असलेले त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम ७३ क अ १ अन्वये सहाय्यक निबंधक तासगाव यांनी अपात्र घोषित केले आहे. या आदेशानुसार ते पुढील ६ वर्षाकरिता कोणत्याही सहकारी संस्थेत पदाधिकारी म्हणून राहण्यास अपात्र ठरले आहेत.
या आदेशानुसार ते कार्यरत असलेल्या प्रकाश पाणीपुरवठा सहकारी संस्था, निमणी व श्री चमन ग्रेप ग्रोअर्स सहकारी सोसायटी या दोन्ही संस्थेच्या संचालक पदावरून त्यांना कमी करण्याचे आदेश झाले होते.
तासगाव तालुका बायो शुगर सहकारी कारखाना लिमिटेड तासगाव या संस्थेच्या दिनांक २९/९/२०२४ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन २०२३-२४ चे अहवाल वाचन करण्यात आले. यावेळी श्री जगन्नाथ पांडुरंग मस्के हे या संस्थेत २०२० पासून चेअरमन पदावर कार्यरत असल्याचे निदर्शनास आले.
त्यांना सदर पदावरून कमी करण्यात यावे तसेच कायद्यानुसार आपण अपात्र आहोत हे ज्ञात असतानाही ही बाब लपवून ठेवून सहाय्यक निबंधक व सहकार विभागाची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी तक्रार निमणी येथील रवींद्र दादासाहेब पाटील यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, तासगाव यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते आर. डी. पाटील यांनी सौ रंजना बारहाते, सहाय्यक निबंधक, तासगाव यांच्याकडे तक्रार दाखल केल्याने तासगाव तालुक्यात खळबळ उडाली असून या तक्रारीचे दखल घेऊन सहाय्यक निबंधक काय निकाल देतात याकडे सहकार व राजकीय वर्तुळातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment

और पढ़ें