Search
Close this search box.

संस्कृती व परंपरा यांचे जतन करून महिलांचा सन्मान करूया – प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी -अतुल काळे

  • वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात महाहादगा कार्यक्रम संपन्न

सांगली/तासगाव : विविधतेने नटलेली भारतीय संस्कृती व परंपरा जपत महिलांचा सन्मान करूया असे उद्गार प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित केलेला महाहादगा कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना काढले.नारी शक्तीचा सन्मान महाविद्यालयात करण्यात आला.यावेळी बोलताना प्राचार्य पुढे म्हणाले आपली परंपरा, सण उत्सव व संस्कृती याचे जतन व संवर्धनाच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात होते त्या दिवसापासून सोळा दिवस हादगा खेळला जातो. प्रथमतः या हादग्याचे प्रतीक हस्त देवतेचे पूजन महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या हस्ते संपन्न झाले .यावेळी महाविद्यालयातील सर्व महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला. हादग्याबरोबरच नवरात्रीमध्ये खेळल्या जाणाऱ्या गरबा व दांडिया नृत्यांच्या स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयात केले जाणार आहे. या स्पर्धांमध्ये सर्व विद्यार्थिनींनी सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना केले. हादग्याचा प्रसाद म्हणून विद्यार्थिनींनी खिरापतीचे विविध पदार्थ आणले होते. विद्यार्थिनींची आणलेली खिरापत ओळखण्याच्या कार्यक्रमानंतर ती खिरापत सगळ्यांना वाटण्यात आली. खिरापत ओळखण्याचा एक वेगळाच आनंद ही विद्यार्थिनींनी घेतला. विविध खिरापतींचा आस्वादही घेतला.महाविद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थिनींना खिरापत वाटण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम कमिटी प्रमुख डॉ.साईनाथ घोगरे यांनी केले तर आभार विज्ञान विभाग प्रमुख प्रा.पी.डी.पाटील यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. आण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ.नरेंद्र कुलकर्णी, ज्युनिअर विभाग प्रमुख एस.डी.पाटील ,प्रबंधक एम.बी. कदम, एम.के. पाटील, प्रा.आर.के.नलवडे यांसह महाविद्यालयातील विविध विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक,प्रशासकीय सेवक वर्ग व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें