Search
Close this search box.

लोकशाही बळकट करण्यासाठी तरुणांनी मतदान करावे – तहसीलदार अतुल पाटोळे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात मतदार नोंदणी अभियान संपन्न

सांगली/तासगाव : महाराष्ट्राच्या विधिमंडळाची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ पूर्ण होत आहे.त्या अगोदर राज्यात निवडणुका घेऊन सरकार स्थापन होण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली. मतदार यादी कार्यक्रमाचे वेळापत्रक पाठवले असून, त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तरुणांनी आपले नाव मतदार यादीत नोंद करून लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करावे असे आवाहन तासगावचे तहसीलदार मा.अतुल पाटोळे यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, निवडणूक साक्षरता मंच आणि तहसील कार्यालय तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मतदार नोंदणी अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
गटशिक्षणाधिकारी आबासाहेब लावंड आणि प्राचार्य जे.ए. यादव यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचे तसेच लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नोडल आधिकारी डॉ.साईनाथ घोगरे यांनी केले तर आभार कार्यक्रम अधिकारी डॉ.तातोबा बदामे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले.या कार्यक्रमाला निवडणूक नायब तहसीलदार रवींद्र सावंत,मंडल अधिकारी टी.एच.तळपे,निलेश भांबुरे, तलाठी पतंग माने,लक्ष्मी पाटील,महसूल सहाय्यक अरविंद पाटील,निवडणूक ऑपरेटर प्रफुल्ल बनसोडे,डॉ.नितीन गायकवाड,डॉ.विलास साळुंखे,प्रा.प्रणया पाटील, प्रा.आर.के.नलवडे यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक,एन.एस.एस.टास्क फोर्स,विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें