Search
Close this search box.

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शहीद स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • . स्वातंत्र लढ्यातील गोष्टींना उजाळा
  • . तासगावचा ऐतिहासिक वारसा नवीन पिढीला करून देण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे : डॉ. बाबुराव गुरव

सांगली/तासगाव : ०९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राष्ट्रसेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव मधील स्वातंत्र्य सैनिक शहीद स्मारकाला अभिवादन करण्यात आले असून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या योगदानाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत प्रा डॉ बाबुराव गुरव म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यातील तासगाव मधील क्रांतिकारकांचे योगदान ऐतिहासिक वारसा लाभलेले आहे तो वारसा जतन करणे आणि नविन पिढीला माहिती करून देण्यासाठी प्रयत्नशील राहीले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. तासगाव चे स्वातंत्र्य सैनिक आमदार गणपतराव कोळी यांचे चिरंजीव अशोकराव कोळी यांनी शहीद स्तंभाला अभिवादन केले. त्यांनी तासगाव येथील क्रांतीकारकाच्या स्मृती सामाजिक काम करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राष्ट्रसेवा दल यांच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर स्मारक स्तंभाची दुरावस्था दुर करुन या ठिकाणच्या स्वच्छता आणि टापटीप याविषयी काहीतरी करता येईल का याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी मा.शरद शेळके, प्रा वासुदेव गुरव, राष्ट्रसेवा दल तासगाव च्या अध्यक्षा मा नुतन परिट,श्रेयस नाईक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तासगाव शाखेचे कार्य अध्यक्ष अमर खोत, दत्तात्रय बामणे, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें