Search
Close this search box.

वृक्षारोपणाने आषाढी एकादशी आणि वाढदिवस साजरा; सांगलीमध्ये अनोख्या उपक्रमाची चर्चा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली : आषाढी एकादशी आणि डॉ ज्ञानचंद्र पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधक महावीर उद्यान (बापट मळा) येथे मॉर्निंग वॉक ग्रुप मेंबर आणि शिवसेनेचे सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख नानासाहेब शिंदे यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले असून आषाढी एकादशी आणि वाढदिवसाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाची सांगली शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. वृक्ष लागवड हा उपक्रम राबवून एक आदर्श नागरिकांनासमोर ठेवला. सुगंध देणाऱ्या सोनचाफा वृक्षाची रोपे यावेळी लावण्यात आली. प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाढदिवस दिवशी एखादे फुलाचे, फळाचे झाड आपल्या सभोवताली लावावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी डॉ.ज्ञानचंद्र पाटील, निवृत्त माजी उपजिल्हाधिकारी
श्री भोसलेसाहेब, महसूल विभागाचे निवृत्त अधिकारी श्री कवठेकर, श्री आलासे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी श्री सचिन खराडे,
शिवसेनेचे श्री नानासाहेब शिंदे आदी मान्यवर, नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें