Search
Close this search box.

रेणू शेतसंदी गोल्ड मेडलसह राज्य गुणवत्ता यादीत….!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग-विवेक परब

• ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत चिंदर कुंभारवाडी शाळेचे 100 नंबरी यश…..!

मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चिंदर कुंभारवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी 7 जानेवारी रोजी झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट (बी डी एस) स्कॉलरशिप परीक्षेत 100% यश संपादन केले आहे. या परीक्षेला 8 विध्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत निकाल 100% लागला आहे.
या मध्ये इयत्ता 2 री मधील कु. रेणू भीमाशंकर शेतसंदी हिने 97 गुण मिळवत गोल्ड मेडल प्राप्त केले आहे व राज्य गुणवत्ता यादीत झेप घेतली आहे. तसेच इयत्ता 1 ली मधील कु. कौस्तुभ निलेश पावसकर याने 93 गुण मिळवत तर इयत्ता 2 री मधील कु. विराज सचिन कांबळे याने 92 गुण मिळवत सिल्वर मेडल प्राप्त केले आहे, इयत्ता 4 थी कु.गंधर्व नारायण चिंदरकर 87 मिळवत ब्राँझ मेडल प्राप्त केले आहे. तर रविराज अशोक पवार, गार्गी उमेश मुणगेकर, सलोनी अमोल पारकर, श्रेयस राजेंद्र चौधरी यांनी यश संपादन केले.
या विद्यार्थ्यांना शिक्षक राजेंद्र चौधरी व भीमाशंकर शेतसंदी, केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर यांचे सहकार्य लाभले. या यशा बद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायण चिंदरकर, शा. व्य. समिती सदस्य, पालक व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें