Search
Close this search box.

महायुती सरकारच्या योजना आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या हजारो कोटींच्या विकासकामांमुळे संग्रामसिंह देशमुख मोठ्या फरकाने जिंकतील: अपर्णाताई देशमुख ; वांगी, शेळकबाव, शिवणी, वडियेरायबाग परिसरात प्रचार दौरा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

: रिपोर्टर सुहास कराडकर

सांगली/कडेगाव न्युज:- सर्व सामान्य माणसाच्या हितासाठी महायुती सरकारने राबविलेल्या योजना आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेली कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांमुळे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख हेच मोठ्या फरकाने जिंकतील, असा विश्वास ग्रीन पॉवर शुगरच्या चेअरमन सौ. अपर्णाताई संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केला.

कडेगाव तालुक्यातील वांगी, शेळकबाव, शिवणी, वडियेरायबाग या गावांमध्ये संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ दौऱ्यात त्या बोलत होत्या.
माजी पंचायत समिती सभापती सौ. मंदाताई करांडे, कडेपूर माजी सरपंच रूपाली यादव, मंगल तुपे वांगी, प्रतिक्षा वाघमोडे वडियेरायबाग यांच्यासह महिला कार्यकर्त्या दौऱ्यात सहभागी झाल्या.
शिवणी येथे माजी सरपंच सौ. शुभांगी पवार, सौ. विद्याताई पवार, सौ. आशा महाडिक, सौ. शालन पवार, सौ. वैशाली पवार, सौ. संगिता पवार, सौ. सिंधुताई पवार, सौ. सुनिता पडळकर, माजी सरपंच सौ. सुवर्णा पवार, सौ. संगिता मोहिते, श्रीमती शांताबाई जाधव, सौ. संगिता खराडे, सौ. मनिषा पवार, सौ.
सौ. संगिता शिंदे, सौ. स्वाती वनपाळ, सौ. शैला शिंदे, सौ. अर्चना पवार, सौ. दिपाली गवळी, सौ. हर्षदा पवार, सौ. शुभांगी जगताप, वडियेरायबाग येथे सौ. संगिता शिंदे, सौ. स्वाती वनपाळ, सौ. शैला शिंदे, सौ. अर्चना पवार, सौ. दिपाली गवळी, सौ. हर्षदा पवार, सौ. शुभांगी जगताप उपस्थित होत्या.
अपर्णाताई देशमुख म्हणाल्या, भारतीय जनता पार्टी महायुती सरकारने महिलांसाठी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह अनेक योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसांना आधार दिला आहे. संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात हजारो कोटींचा निधी आणला. रस्ते, भूमीगत गटारे, समाज मंदिरे, अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची योजना अशा प्रकारची हजारो कोटींची विकासकामे केली आहेत. ही कामे करत असताना त्यांनी आपला गट, पक्ष असा कोणताही भेदभाव केला नाही. जनतेच्या कल्याणासाठी नेहमीच संघर्ष करण्याची त्यांची तयारी असते. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना ते एवढं काम करतात तर आमदार झाल्यावर मतदार संघाचे चित्रच बदलून जाईल. पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना निवडणून द्या असे आवाहन अपर्णाताई देशमुख यांनी केले.
…….

फोटो ओळ

१) कडेगाव तालुक्यातील शिवणी येथील बैठकीत बोलताना अपर्णाताई देशमुख, सोबत माजी पंचायत समिती सभापती सौ. मंदाताई करांडे, कडेपूर माजी सरपंच रूपाली यादव, मंगल तुपे वांगी, प्रतिक्षा वाघमोडे आदी

२) कडेगाव तालुक्यातील शिवणी येथील बैठकीत ग्रीन पॉवर शुगरच्या चेअरमन सौ.अपर्णाताई देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. सोबत माजी पंचायत समिती सभापती सौ. मंदाताई करांडे, कडेपूर माजी सरपंच रूपाली यादव, मंगल तुपे वांगी, प्रतिक्षा वाघमोडे आदी

Leave a Comment

और पढ़ें

भारतीय मीडिया फाउंडेशन में आनंद राजनाथ दुबे को राष्ट्रीय उपाध्यक्ष सांस्कृतिक फोरम, दीनानाथ सैनी को राष्ट्रीय सचिव, संजय कुमार पटेल को जिला अध्यक्ष अधिवक्ता फोरम चंदौली, अवधेश उपाध्याय को ब्लॉक अध्यक्ष चिकित्सा फोरम नियमताबाद चंदौली के पद पर किया गया नियुक्त।

भारतीय मीडिया फाउंडेशन में आनंद राजनाथ दुबे को राष्ट्रीय उपाध्यक्ष सांस्कृतिक फोरम, दीनानाथ सैनी को राष्ट्रीय सचिव, संजय कुमार पटेल को जिला अध्यक्ष अधिवक्ता फोरम चंदौली, अवधेश उपाध्याय को ब्लॉक अध्यक्ष चिकित्सा फोरम नियमताबाद चंदौली के पद पर किया गया नियुक्त।