Search
Close this search box.

तासगावात आचारसंहितेचा भंग केल्याबाबत गुन्हा नोंद

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर पैसे वाटपाचा आरोप
  • रोहित पवार यांची डोकेदुखी वाढली

सांगली/तासगाव : आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तासगाव मध्ये गुन्हा नोंद झाला असून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी, रविवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी तासगाव येथील साठे नगर भागात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित आर आर पाटील यांची पदयात्रा सुरू होती. या पदयात्रेच्या पाठीमागे सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील, वय ४८, राहणार वरचे गल्ली, तासगाव व बाबासाहेब उर्फ खंडू निवृत्ती कदम, वय ३५, राहणार वरचे गल्ली, तासगाव हे काही घरांमध्ये ये जा करत होते.
पदयात्रा पाहण्यासाठी गेलेले व घटनेचे साक्षीदार राजेंद्र उर्फ गणेश मोहन चव्हाण राहणार भवानीनगर चिंचणी ता.तासगाव जि. सांगली यांना संशय आल्याने त्यांनी खात्री केली असता मतदारांना रोख रक्कम व वस्तू वाटप होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी काही सहकार्‍यांना बोलावून घेतले. सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील यांना विचारले असता, मी शरद पवार यांची राष्ट्रवादी पार्टीचे विधानसभेचे उमेदवार रोहित पाटील यांचे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला मतदान करण्यासाठी साठे नगर तासगाव येथील मतदारांना फराळाचा एक बॉक्स व ३,००० रुपयांचे पाकीट देत होतो असे त्यांनी सांगितले.
भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी दरम्यान सक्षम अधिकाऱ्याचा परवाना आहे काय? असे विचारले असता त्यांनी असा कोणताही परवाना काढला नाही असे सांगितले. भरारी पथकाने झडती घेतली असता पांढऱ्या रंगाची १६ पाकिटे, त्यामध्ये प्रत्येकी ३००० रुपये तसेच पाचशे रुपयांच्या १११ नोटा व ५,००० रुपये रोख अशी एकूण १,०८,५०० रुपये इतकी रक्कम आढळून आली. तसेच त्यांच्याकडे असलेला एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला.
सदरचे दोन्ही इसम पैसे असलेली पाकिटे देत असताना आढळून आल्याने त्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी २८७ तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघ यांनी नियुक्त केलेल्या भरारी पथकाचे प्रमुख शिवप्रसाद प्रकाश भिसे राहणार आमणापूर तालुका पलूस जिल्हा सांगली यांनी फिर्याद दिली.
दरम्यान, पैसे वाटणाऱ्या दोघांना पोलीस स्टेशन येथे आणल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले होते. विधानसभेचे उमेदवार श्री संजयकाका पाटील यांनीही पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पैसे वाटताना सापडलेला सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील याला चौकशी सुरू असताना छातीत दुखण्याचा त्रास सुरू झाल्याने त्याला तासगाव येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले. दवाखान्यात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. रोहित पाटील यांच्या भगिनी सौ. स्मिता थोरात यांनीही पोलीस स्टेशनमध्ये येऊन उपविभागीय अधिकारी श्री सचिन थोरबोले यांच्याशी चर्चा केली. आबा- काका गटाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशन आवारात आल्याने काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. रात्री उशिरा फिर्याद घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास तासगाव पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

भारतीय मीडिया फाउंडेशन में आनंद राजनाथ दुबे को राष्ट्रीय उपाध्यक्ष सांस्कृतिक फोरम, दीनानाथ सैनी को राष्ट्रीय सचिव, संजय कुमार पटेल को जिला अध्यक्ष अधिवक्ता फोरम चंदौली, अवधेश उपाध्याय को ब्लॉक अध्यक्ष चिकित्सा फोरम नियमताबाद चंदौली के पद पर किया गया नियुक्त।

भारतीय मीडिया फाउंडेशन में आनंद राजनाथ दुबे को राष्ट्रीय उपाध्यक्ष सांस्कृतिक फोरम, दीनानाथ सैनी को राष्ट्रीय सचिव, संजय कुमार पटेल को जिला अध्यक्ष अधिवक्ता फोरम चंदौली, अवधेश उपाध्याय को ब्लॉक अध्यक्ष चिकित्सा फोरम नियमताबाद चंदौली के पद पर किया गया नियुक्त।