Search
Close this search box.

तासगावच्या बाह्य वळणासाठी 173 कोटी मंजूर, तासगाव-कवठेमहांकाळच्या आमदारांनी केला पाठपुरावा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • तासगावच्या रिंग रोड बाबत स्वर्गीय आर.आर. आबांनी पाहिलेले स्वप्न होणार पूर्ण
  • आमदार सुमनताई पाटील, रोहितदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
  • फटाक्यांच्या आतषबाजीत राष्ट्रवादीचा जल्लोष

सांगली/तासगाव : तासगावच्या बाह्य वळणाची मागणी बरेच दिवस होत होती. तासगाव कवठेमहांकाळचे स्थानिक आमदार याबाबतीत वेळोवेळी यासंदर्भात भेटत होते. या कामासाठी 173 कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि हे काम लवकरच पूर्ण होईल अशी ग्वाही भाजपचे केंद्रीय रस्ते मंत्री नितीनजी गडकरी यांनी सांगली येथे दिली.
तासगाव शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नाबाबत रिंग रोड पूर्णत्वासाठी वेळोवेळी आमदार सुमनताई पाटील आणि युवा नेते रोहितदादा पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पाठपुरावा केल्याचे स्पष्ट झाले. श्री. गडकरी यांनी दिलेल्या माहितीनंतर तासगाव शहरात मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख चौकात फटाक्यांची आतषबाजी केली. स्वर्गीय आर. आर. आबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आनंद साजरा करण्यात आला.
याबाबत बोलताना रोहित पाटील म्हणाले, तासगाव शहरात बाहेरील रिंग रोड बनविणे आबांचे मोठे स्वप्न होते. काही अडचणींमुळे हे काम प्रलंबित पडले. तासगाव-कवठेमहांकाळच्या आमदार सुमनताई पाटील आणि मी याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करत राहिलो. रिंग रोड साठी 173 कोटी रुपये मंजूर झाले हे त्याचे फलित आहे. आता स्वर्गीय आर. आर. आबांचे स्वप्न लवकरच साकर होईल. त्यामुळे नागरिकांना होणारा वाहतूक कोंडीचा त्रास लवकरच दूर होईल.

Leave a Comment

और पढ़ें

जेवर एयरपोर्ट के द्धितीय चरण में अधिग्रहण की जा रही भूमि से प्रभावित कृषकों की समस्याओं का त्वरित गति से निस्तारण कराने के उद्देश्य से आज छेदी सिंह इंटर काॅलिज आकलपुर, म्याना जेवर में किसान चौपाल का किया गया आयोजन

जेवर एयरपोर्ट के द्धितीय चरण में अधिग्रहण की जा रही भूमि से प्रभावित कृषकों की समस्याओं का त्वरित गति से निस्तारण कराने के उद्देश्य से आज छेदी सिंह इंटर काॅलिज आकलपुर, म्याना जेवर में किसान चौपाल का किया गया आयोजन