Search
Close this search box.

दारूबंदी गेली कोमात…दारू विक्री होतेय जोमात… दारूबंदीचा विषय रंगला चांगलाच… आणि गरिबाच्या खिशाला नडला मात्र चांगलाच…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी -: सचिन मुतडक

राजुर गावची दारू होतच नाही बंद….संतप्त नागरिकांची एकच मागणी आडवी बाटली उभी करा नाहीतर दारू कायमची हद्दपार करा…

दारूबंदी असूनही राजुर गावात दारूबंदीची चर्चा रंगतच जाते. याचाच अर्थ 2005 साली दारू फक्त कागदावर बंद झाली. आणि प्रत्यक्षात चालूच राहिली. अनेक वर्षापासून दारूचा संघर्ष अनेक कार्यकर्ते करतात. परंतु राजुर गावाची दारू काही केल्याने बंदच होतच नाही. त्यातच आता 31 मे रोजी स्पेशल दारूबंदीचा विषय राजूर ग्रामपंचायत मध्ये चांगल्या प्रकारे रंगला. आदल्या दिवशी म्हणजेच 30 मे या तारखेला ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच व अनेक सदस्यांनी दारूबंदी हा विषय हाताशी घेऊन दारू विक्रेत्यांवर हल्लाबोल मोर्चा केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा विषय चांगलाच रंगला, पाच-सहा दिवस दारू बंद दिसली. परंतु पुन्हा दारू जोमाने चालू झाली, ही दारू चालू होण्यामागे हात नक्कीच आहे तरी कोणाचा हा प्रश्न लोकांसमोर अनुत्तीरितच राहिला. दारूबंदीचा विषय ग्रामपंचायत मध्ये रंगला परंतु सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र मोठ्या प्रमाणावर झळ सोसण्याची वेळ या दारूबंदीच्या विषयामुळे आली. दारू पिणारा हा दारू पितोच परंतु आज मीतिला तीच देशी दारूची कॉटर १४० ते १५० रुपयांनी खरेदी करण्याची वेळ या दारू पिणाऱ्या ग्राहकांवर आलेली आहे. अशाच प्रकारे जर दारू विक्रेते मोठ्या प्रमाणावर हप्ते देऊन विषारी दारू विकून पैसे कमवू लागले. तर त्या दारूबंदीचा उपयोग तरी काय, त्यामुळे सर्वसामान्य जनतेमधून मोठ्या प्रमाणावर आक्रोश केला जात असून. ही दारूबंदी म्हणजे राजुर साठी थोटांड आहे. अशा थोटांडा चा उपयोग तरी राजूरला काय..? त्यापेक्षा रीतसर कायदेशीर दारू राजुर मध्ये चालू व्हावी. म्हणजेच आडवी बाटली उभी करावी त्यासाठी राजुर मधून ग्रामपंचायतने मतदान घेण्यासंदर्भात लवकरात एक ग्रामपंचायतची ग्रामसभा स्पेशल दारू विषयी लावावी, जेणेकरून त्या सभेमध्ये फक्त दारूबंदीचाच विषय घेऊन त्यावर एकच काहीतरी तोडगा काढावा. एकतर दारू कायमची बंद झाली पाहिजे, नाहीतर दारू चालू करून लोकांना विषारी दारूपासून वाचवावे, असे अनेक नागरिकांचे म्हणणे राजूर मधून दिसून येत आहे. तसेच राजूरकरांचे असेही म्हणणे आहे की दारू ही कधीही बंद होऊ शकत नाही, उलट दारू लोकांना महाग घेऊन प्यावी लागते. आणि ही विषारी दारू पिऊन लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. जर या गावात दारूबंदी होतच नसेल तर कायदेशीर दुकान चालू करून राजूरची दारूबंदी कायमची उठवावी. असा जन आक्रोश लोकांमधून दिसून येत आहे. प्रत्यक्ष लोक बोलू शकत नाही परंतु अनेक लोकांच्या चर्चेतून हा विषय ऐकायला मिळत आहे. 2005 साली झालेली दारूबंदी खरंच दारूबंदी होती का..? का जिरवा जिरवीचे राजकारण तर नव्हतं ना..? यावर देखील सर्वसामान्य नागरिक आता बोलू लागला आहे. अनेक वर्षापासून राजूर गावामध्ये नावापुरता दारूबंदी असून, सर्रासपणे दोन नंबर मध्ये दारू विकून अनेक दारू व्यवसायिक गडगंज होताना दिसून येत आहे. त्यांना पाठीशी घालणारे देखील गडगंज होताना दिसून येत आहे. असा एकच सूर सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे. यामध्ये फरपट होती ती गोरगरीब जनतेची कारण त्यांनाही दारूची बाटली १४० ते १५० रुपयाला घ्यावी लागते. जो मजूर दिवसभर काम करून तीन चारशे रुपये रोज कमवतो. त्याच्या खिशाला न परवडणारी ही विषारी दारू पाजण्याचं काम करणारे अनेक हात आहे तरी कोणाची..? कारण दारू विकणारा कोणाच्या जीवावर वर दारू विकतो..? एवढ्या सगळे प्रकार होऊन देखील दारू विकतो..? म्हणजे त्याला कोणाचातरी पाठबळ असल्याशिवाय का..? असा संतप्तप्रश्न राजूरकरांना पडलेला आहे. म्हणूनच राजूरकर म्हणत आहे ही आडवी बाटली उभी करा जेणेकरून लोकांना विषारी दारूपासून वाचवता तरी येईल. आणि दारू पिणारा कुठेही जाऊन दारू आणतोच. असे अनेक चित्र विचित्र सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे. म्हणूनच राजुर ग्रामपंचायतींनी पुन्हा एकदा ग्रामसभा घेऊ ग्रामसभेमध्ये दारूबंदी जर होत नसेल, तर त्यासाठी राजुर गावामध्ये दारू चालू व्हावी, की बंद व्हावी, यासाठी सर्वसामान्य जनतेतून मतदान घेऊन यावर एक मोठा निर्णय घेणं अत्यंत गरजेचं बनलेलं आहे. जेणेकरून ही विषारी दारू विकणाऱ्यांच दुकानदारी बंद करून, लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा डाव कधी बंद होणार….

Leave a Comment

और पढ़ें